इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात १ कोटी ५६ लाखांचा अवैध गुटखा जप्त
इगतपुरी, 2 जून (हिं.स.)। शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पा
इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात १ कोटी ५६ लाखांचा अवैध गुटखा जप्त :  नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई


इगतपुरी, 2 जून (हिं.स.)।

शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या इसमांवर छापे टाकून १ कोटी ५६ लाखांचा गुटखा जप्त केला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि प्रकाश भालेराव, पोहवा प्रविण काकड, रावसाहेब कांबळे, संदिप नागपुरे, दिपक गुंजाळ, विश्वनाथ धारबले, शरद धात्रक, सतिष जगताप, माधव साळे, नवनाथ वाघमोडे, प्रविण गांगुर्डे, मपोहवा योगिता काकड, पोकॉ विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.

इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत ७३ लाख ३८ हजारांचा अवैध गुटखा जप्त -

आज दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली होती. ह्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात न्यु अपना हॉटेल समोर छापा टाकून राखाडी रंगाचे आयशर ट्रकमधुन अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा इसम सैय्यद गफुर सैय्यद गुरसाब मुल्ला, वय ३७, रा. नरोना, ता. आळण, जि. गुलबर्गा, कर्नाटक याला ताब्यात घेतले. हा इसम हा चोरट्या रितीने गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आला असून त्याच्या कब्जातून रॉयल ब्लेंडेड बाजीराव, बी-आर गोल्ड पानमसाला व मस्तानी २१६ प्रिमियम सुगंधीत गुटख्याचा ६१ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा अवैध गुटखा, आयशर ट्रक असा एकुण ७३ लाख ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील ताब्यात घेतलेला इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठयास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत /स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे, हे माहिती असतांना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगुन वाहतूक करतांना मिळून आला. त्याच्याविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुरनं ९५/२०२५ भा. न्या. सं. कलम १२३, २७४, २७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव पो.स्टे. हद्दीत ८३ लाख ५५ हजारांचा अवैध गुटखा जप्त -

आज दुपारचे सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळालेवरून स्थागुशाचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत शिवारात हॉटेल हरे कृष्णासमोर छापा टाकून अशोक लेलंड कंपनीचे ट्रकमधुन अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा इसम कल्लु खाँ उर्फ कल्लु हकीम खान, वय ४१, रा. वार्ड नं.१९, ग्राम सियापुरा, तहसील देवास, राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले. हा इसम हा चोरट्या रितीने गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आला. त्याच्या कब्जातून प्रिमियम राजनिवास व प्रिमियम झेड. एल.०१ सुगंधीत गुटख्याचा ६९ लाख ४९ हजार ६८ रूपये किंमतीचा अवैध गुटखा, अशोल लेलँड ट्रक असा एकुण ८३ लाख ५५ हजार ६८ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील ताब्यात घेतलेला इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत / स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे, हे माहिती असतांना देखील स्वतःचे फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगुन वाहतूक करतांना मिळून आला असून त्याविरूध्द पिंपळगाव पोलीस ठाणेस भा. न्या. रां. कलम १२३.२७४,२७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरीलप्रमाणे अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या इसमांवर छापे टाकुन कारवाई केली असून ह्या कारवाईमध्ये १ कोटी ५६ लाख ९३ हजार ६८ रूपये किंमतीचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील आरोपीना वरील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली असून सदर प्रकरणी पुढील तपास इगतपुरी व पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहे.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande