सोलापूर, 1 जून (हिं.स.)।
गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित केल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या अशा परिस्थितीत थेट नगराध्यक्ष पदाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतून मिळावी, अशी मागणी माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी केले.
याच नगराध्यक्ष पदाच्या जागेवर भाजपचे शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी भाजपचा हक्क सांगितल्यामुळे महायुतीतील घटक पक्षानेच नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष पदावर दावा केल्यामुळे नेमकी जागा कुणाला मिळणार ? याविषयी चर्चा सुरू झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्या खा. सुनेत्रा पवार ह्या नुकत्याच सोलापूर दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी थेट नगराध्यक्षपदी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी पाच वर्षात चांगले काम केले. विकास कामासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवेढा शहरासाठी मागेल तेवढा निधी दिल्यामुळे शहराच्या विकासामध्ये भर पडल्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत ती जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी त्यांनी केली.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड