मनमाड, 11 जून (हिं.स.)। मनमाड येथे डमरे कॉलनीमध्ये राहणाऱ्या मुरतुजा रस्सीवाला या दरवाजे खिडक्या बनवणाऱ्या व्यापारीच्या घरी धाडसी घरफोडी घडली असुन या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल दीड किलोपेक्षा जास्त सोन व 8 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असुन शहरात येत्या पंधरा दिवसात ही 3 री मोठी चोरीची घटना घडली आहे या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले असुन पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड येथील कॅम्प भागातील डमरे कॉलनी परिसरात दरवाजे ,खिडक्या बनविणारे व्यापारी मुरतुजा रस्सीवाला यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून घरफोडी करण्यात आली असून या घरफोडीत 1किलो 600 ग्राम सोन आणि 8 लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले या घटनेची माहिती मुरतुजा यांनी पोलिसांना दिल्यानंतर नाशिक येथील डॉग स्कोड , फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली मुरतुजा हे आपल्या आईला आणण्यासाठी रविवारी रात्री आर्वी येथे गेले होते त्यानंतर सोमवारी दुपारी त्यांची पत्नी आणि मुलगा हे घरी आले व नंतर संध्याकाळी नाशिकला गेले त्यानंतर बुधवारी सकाळी 6 वाजता मुरतुजा हे घरी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली विशेष म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्याला लावलेले कुलुप तसेच होते चोरांनी बंगल्याच्या माघील बाजूला असलेल्या खिडकी चे गज कापून आत प्रवेश केला आणि त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाचे दरवाजे तोडून त्या मध्ये ठेवलेले 1 किलो 600 ग्राम सोन आणि 8 लाख रोख रक्कम चोरून पसार झाले या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असुन शहरात गेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी चोरीची घटना घडली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI