रत्नागिरी : केळशीच्या तलाठ्याला २० हजाराची लाच घेताना अटक
रत्नागिरी, 11 जून, (हिं. स.) : उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना केळशी (ता. दापोली) येथील तलाठी राजेंद्र उंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एका ४९ वर्षीय नागरिकाने याबाबतची तक्
रत्नागिरी : केळशीच्या तलाठ्याला २० हजाराची लाच घेताना अटक


रत्नागिरी, 11 जून, (हिं. स.) : उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना केळशी (ता. दापोली) येथील तलाठी राजेंद्र उंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एका ४९ वर्षीय नागरिकाने याबाबतची तक्रार दिली होती. त्यांचा उत्पन्नाचा दाखला संमत करण्यासाठी केळशी येथील तलाठी राजेंद्र उंडे २० हजार रुपयांची लाच मागत असल्याची ही तक्रार ५ जून रोजी करण्यात आली होती. त्याच दिवशी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली आणि उंडे याने २० हजार रुपये १० जून या दिवशी स्वीकारण्याचे मान्य केले. या दिवशी पंचांसमक्ष ग्राममहसूल अधिकारी उंडे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande