राजापूर तालुक्यात एकाच रात्री पाच जणांकडे घरफोडी
रत्नागिरी, 11 जून, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी आणि मधलीवाडी येथील रहिवासी अशोक महाडेश्वर, ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी एकूण ४ लाख ४३ हजा
राजापूर तालुक्यात एकाच रात्री पाच जणांकडे घरफोडी


रत्नागिरी, 11 जून, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी आणि मधलीवाडी येथील रहिवासी अशोक महाडेश्वर, ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी एकूण ४ लाख ४३ हजाराचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे सराईत असावेत, असा पोलिसांचा कयास असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे बंद घरे फोडून झालेल्या चोऱ्यांबाबत माहिती घेताना त्यातील आरोपींची चोरीची पद्धत, त्यात काही साधर्म्य आहे का, याबाबत खात्री केली जात आहे. सर्व तांत्रिक बाजुंनीही तपास केला जात असून लवकरच चोरटे हाती लागतील, अशी खात्री पोलिसांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande