विमान अपघातात नागपूरच्या यशा कामदार-मोढांचा मृत्यू
कुटुंबातील इतर दोघांचा देखील मृतकांमध्ये समावेश नागपूर, 12 जून (हिं.स.) : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मुळच्या नागपूरकर असलेल्या यशा कामदार-मोढा यांचा मृत्यू झाला आहे. मोढा कुटुंबिय शोकसभेसाठी लंडनला निघाले असताना त्या
विमान अपघातानंतर आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी


कुटुंबातील इतर दोघांचा देखील मृतकांमध्ये समावेश

नागपूर, 12 जून (हिं.स.) : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मुळच्या नागपूरकर असलेल्या यशा कामदार-मोढा यांचा मृत्यू झाला आहे. मोढा कुटुंबिय शोकसभेसाठी लंडनला निघाले असताना त्यांच्यावर काळाचा घाला पडल्याची माहिती कामदार कुटुंबियांनी दिली.

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 242 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरात वास्तव्याला असलेल्या मनीष कामदार यांची विवाहीत कन्या यशा कामदार-मोढा त्यांचा मुलगा रुद्र कामदार आणि यशाच्या सासू रक्षा मोढा यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच यशा कामदार यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

यशा कामदार यांचे सासरे लंडनमध्ये व्यवसाय करत होते. ते कॅन्सरच्या उपचारासाठी काही काळ अहमदाबाद येथे होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आठवणींसाठी लंडनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत सहभागी होण्यासाठी यशा, रुद्र आणि रक्षा मोढा हे तिघेही शोकसभेसाठी लंडनला जात असताना अपघाताला बळी पडलेत.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande