चोरट्याने सोलापुरातून पळविला दीड लाखांचा घोडा
सोलापूर, 14 जून (हिं.स.)। वडिलांचा अनेक वर्षांपासून टांगा चालविण्याचा व्यवसाय होता, काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद पडला. पण, बालपणी वडिलांसोबत फिरताना घोड्यांबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने अतिश वसंत पवार (वय २९, रा. जुना पूना नाका, हांडे प्लॉट, सोलापूर)
चोरट्याने सोलापुरातून पळविला दीड लाखांचा घोडा


सोलापूर, 14 जून (हिं.स.)। वडिलांचा अनेक वर्षांपासून टांगा चालविण्याचा व्यवसाय होता, काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद पडला. पण, बालपणी वडिलांसोबत फिरताना घोड्यांबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने अतिश वसंत पवार (वय २९, रा. जुना पूना नाका, हांडे प्लॉट, सोलापूर) या तरुणाने दीड लाखांचा घोडा दोन महिन्यांपूर्वीच विकत घेतला होता. तो घोडा चोरट्याने चोरून नेला असून पवार यांनी या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सोलापूर शहरातून दररोज सरासरी दोन दुचाकी चोरी होतात, अशी स्थिती आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने, रिक्षा प्रवासात महिलांचे साहित्य चोरी, घरफोडी असेही शहरात गुन्हे सतत घडतात. पण, आता चोरटे कुत्री, घोडा असे पाळीव प्राणी देखील सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. एक महिन्यापूर्वी सदर बझार पोलिसांच्या हद्दीतील सात रस्ता परिसरातून चोरट्यांनी महागडा पाळीव कुत्रा चोरून नेला होता. अशीच घटना एक वर्षापूर्वी सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतच सिव्हिल चौक परिसरात घडली होती. दरम्यान, आता अतिश पवार यांनी केमवरून (ता. करमाळा) दोन महिन्यांपूर्वीच दीड लाख रुपये देऊन घोडा आणला होता. फिर्यादी रिक्षा चालवतात. त्यांनी आवड म्हणून घोडा विकत घेतला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande