आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप : प्रणती नायकने  पटकावले कांस्यपदक
सेऊल, 14 जून (हिं.स.)। दक्षिण कोरियातील जेचियोन येथे सुरु असलेल्या आशियाई आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये महिलांच्या व्हॉल्ट स्पर्धेत भारताच्या प्रणती नायकने कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. ३० वर्षीय भार
प्रणती


सेऊल, 14 जून (हिं.स.)।

दक्षिण कोरियातील जेचियोन येथे सुरु असलेल्या

आशियाई आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये महिलांच्या व्हॉल्ट

स्पर्धेत भारताच्या प्रणती नायकने कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. ३० वर्षीय

भारतीय जिम्नॅस्टने १३.४६६ गुण मिळवून पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा झांग यिहान आणि

व्हिएतनामचा न्गुयेन थी क्विन न्हू यांच्यानंतर तिसरे स्थान पटकावले.

टोकियो

२०२० ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रणती नायकने पहिल्या प्रयत्नात

१३.६६६ गुण मिळवले. मात्र, अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात १२.८६६ गुण मिळवल्याने ती

लीडरबोर्डमध्ये खाली घसरली.पात्रता फेरीत १३.०८३ गुणांसह चौथे

स्थान मिळवून प्रणतीने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

प्रणती

नायकचे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत हे तिसरे कांस्यपदक ठरले आहे. यापूर्वी तिने २०१९

आणि २०२२ मध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande