डब्ल्यूटीसी फायनल : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आफ्रिकन संघ अजिंक्य
द. आफ्रिकेने २७ वर्षांनी पटकावले आयसीसी विजेतेपद लंडन, 14 जून (हिं.स.)। डब्ल्यूटीसी फायनल्स अर्थातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून मात केली. या विजयासह आफ्रिकन संघाने आपल्यावरील ‘चोक
बरका


द. आफ्रिकेने २७ वर्षांनी पटकावले आयसीसी विजेतेपद लंडन, 14 जून (हिं.स.)।

डब्ल्यूटीसी फायनल्स अर्थातच वर्ल्ड टेस्ट

चॅम्पियशीपच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून मात केली. या

विजयासह आफ्रिकन संघाने आपल्यावरील ‘चोकर्स’ हा शिक्का

अखेर पूसून टाकला आहे. कगिसो रबाडा, एडेन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा हे दक्षिण

आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२

धावांचं आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना एडेन मार्करम आणि टेम्बा बावुमाने

१५० हून अधिक धावांची भागिदारी रचत आफ्रिन संघाच्या विजयाचा पाया रचला. मार्करने

१३६ तर कर्णधार बावुमाने ६६ धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय साकारुन दिला. तर

या सामन्यात एकूण ९ गडी बाद करणारा कगिसो रबाडा खऱ्या अर्थाने या संघांच्या

विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात शतक झळकावणारा मार्करम सामनावीराचा मानकरी ठरला.

१९९८ मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्यांना तबब्ल २७

वर्षांपासून एकदाही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आलेली नव्हती. आययसीसीच्या अनेक

स्पर्धांमध्ये कायमच मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ अशीच त्यांची क्रिकेट विश्वात

ओळख होती. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली

आपल्यावरी चोकर्सचा शिक्का पुसण्यात २७ वर्षांनी यश मिळालं आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande