आयएसएसएफ विश्वचषक २०२५ : सुरुची सिंगने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये जिंकले सुवर्णपदक
म्युनिक, 14 जून (हिं.स.)। जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय नेमबाज सुरुची सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. म्युनिकमधील विजयामुळे सुरुचीने या वर्षीच्या आयएसएसएफ
सुरुीची सिंग


म्युनिक, 14 जून (हिं.स.)।

जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय नेमबाज सुरुची

सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. म्युनिकमधील

विजयामुळे सुरुचीने या वर्षीच्या आयएसएसएफ विश्वचषकातही आपले वर्चस्व कायम ठेवले, ब्युनोस आयर्स आणि लिमा लेगमध्येही तिने

अव्वल स्थान पटकावले होते.

१९ वर्षीय भारतीय नेमबाजा सुरुचीने अंतिम फेरीत एकूण

२४१.९ गुणांसह फ्रान्सच्या कॅमिल जेड्रझेजेव्स्कीला मागे टाकले. पीपल्स रिपब्लिक

ऑफ चायनाच्या कियानक्सुन याओने २२१.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले. दरम्यान, सुरुची

एकेकाळी १६२.३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती, ती कियानक्सुनपेक्षा

०.४ गुणांनी मागे होती. मात्र तरीही तिनं ही पिछाडी भरुन काढत अव्वल स्थान मिळवलं.

सुरुची सिंगचे सुवर्णपदक हे म्युनिकमधील भारताचे तिसरे

पदक होते. सिफ्ट कौर समरा आणि एलावेनिल वॅलारिवन यांनी अनुक्रमे महिलांच्या ५०

मीटर रायफल थ्री पोझिशन आणि १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande