नाशिक, 15 जून, (हिं.स.)- जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने नानाराव ढोबळे सभागृह गंगापूर रोड येथे नियमित एसडीपी व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा सन्मान सोहळा प्रमुख पाहुणे रामबंधू मसाले संचालक हेमंत राठी, प्रमुख वक्ते रा. स्व. संघ नाशिक महानगर जिल्हा कार्यवाह सुहासजी वैद्य, जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले.
जनकल्याण रक्तकेंद्राचे कार्य सेवा वृत्तीने होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. विविध सामाजिक संस्था सातत्याने वर्षानुवर्षे नियमित पने रक्तदान शिबीर भरवतात जे इतर काही देऊ शकत नाही ते स्वतःच रक्त देताय आणि हि जी सामाजिक बांधीलकी आहे हि समाजसेवेची कुठेतरी एक जाणीव आहे ती या लोकांकडून अश्या कार्यक्रमा मधून लक्षात येते.
समाजाचा आपल काहीतरी नातं आहे, ती बांधिलकी मानणारे आपण सगळे समाजातील जागृत नागरिक आहोत आणि म्हणून आपण रक्तदान करायला सुद्धा प्रसंगी पुढे येतो. आपल्याला माहिती असेल कुणाला तरी आवश्यकता आहे आणि ती मी पूर्ण करू शकतो आणि ती गरज पूर्ण केली पाहिजे असे म्हणणारे आपण सर्व आहोत, आपल्या कामाची हि प्रेरणा आहे. जे काही आमचे कर्तृत्व आहे ते सर्वांना कामी लाभो असे वाटणारे आपण सर्व जण आहोत.
कुठलेही काम यशस्वी करायचे असेल तर त्याचे अधिष्ठान अत्यंत पवित्र पाहिजे जनकल्याण रक्तपेढी ज्या भावनेतून हे सर्व काम सुरु आहे मला वाटते ते अधिष्ठान त्याच्या मागचे जे प्रेम आहे ते इतके पवित्र आहे म्हणून समाजातील सर्व लोकं सुद्धा अश्या सगळ्या कामाशी जोडले जाताय. थॅलेसेमिया बालकांना रक्तसंक्रमण, महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, थॅलेसेमिया जनजागृती अभियान असे विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रम जनकल्याणच्या वतीने राबविले जातात अत्यंत कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते रा.स्व.संघाचे नाशिक जिल्हा कार्यवाह सुहाजी वैद्य यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI