माथेरान, 15 जून (हिं.स.)। माथेरानच्या शार्लेट तलावात 3 पर्यटक बुडाले असून त्यातील सुमित चव्हाण वय 16, आर्यन खोब्रागडे वय 19 व फिरोज शेख वय 19 आणि तिन्ही पर्यटक नवी मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे.
शार्लेट तलावात पोहण्यासाठी तिन पर्यटक बुडालेत माहिती समोर येताच माथेरान पोलीस व माथेरान सह्याद्री रेस्कू टीम ने शोध मोहीम सुरु केली. शार्लेट तलावातं पोहण्यास सक्त मनाई असताना देखील पाण्यात जाऊन आपला जीव गमावला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant