नाशकात १४ लाखांचे कीटकनाशक जप्त
नाशिक, 2 जून (हिं.स.)। - जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून सुमारे १४ लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकासह वाहन जप्त केले आहे. याबाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कीटकनाशक निरीक्षक जगन भावराव सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात फिर्
नाशकात १४ लाखांचे कीटकनाशक जप्त


नाशिक, 2 जून (हिं.स.)।

- जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून सुमारे १४ लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकासह वाहन जप्त केले आहे.

याबाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कीटकनाशक निरीक्षक जगन भावराव सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले, की आरोपी किशोर एकनाथ ठाकूर (रा. जुना सायखेडा रोड, जेलरोड, नाशिकरोड) यांचे नांदूर-जत्रा लिंक रोड, आडगाव शिवार येथे कीटकनाशक विक्रीचे दुकान आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी संशयित दुकानदार किशोर ठाकूर यांनी कोणत्याही प्रकारचा उत्पादन व विक्री परवाना सादर केला नाही. म्हणून त्यांच्याविरुद्ध शासनातर्फे विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली असून, यावेळी पथकाने त्यांच्याकडील संशयित निविष्ठा एक हजार मिलिच्या सुमारे ६ लाख ८८ हजार ७०० रुपये किमतीच्या कीटकनाशकांच्या बाटल्या व एमएच १५ एचयू ३५११ या क्रमांकाचे टाटा पंच वाहन असा एकूण १३ लाख ८८ हजार ७०० रुपये किमतीचा साठा हस्तगत करून कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande