नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स स्पर्धा संपन्न
नाशिक, 2 जून (हिं.स.) : नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथॅंटीक ट्रकवर वरिष्ठ गटाचा पुरुष आणि महिलांच्या जिल्हा मैदानी स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिव
नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स स्पर्धा संपन्न


नाशिक, 2 जून (हिं.स.) : नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथॅंटीक ट्रकवर वरिष्ठ गटाचा पुरुष आणि महिलांच्या जिल्हा मैदानी स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी महिलांचे विविध प्रकार पार पडले. यामध्ये पुरुषांच्या २०० मीटर धावणे प्रकारात एकलव्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या हर्षल बच्छाव याने हे आंतर २२.८१ सेकंदात पूर्ण करून विकेतेपद मिळविले. तर रनर्स ९९ कळंबच्या पियुष सोनार याने दुसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल्स प्रकारात आदिवासी क्रीडा प्रबोधीनीच्या हे आंतर ५४.९० सेकंदात पूर्ण करू विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात नाशिक क्रीडा प्रबोधीनीच्या शुभं दिघे याने १.मीटर उंच उडी घेत प्रथम क्रमांक मिळविला. पुरुषांच्या ट्रिपल जम्प (तीहेरी उडी) या प्रकारात व्ही.डी.के स्पोर्ट्स फौंडेशनच्या श्रीजय पाटील, स्मित चौरे आणि प्रज्वल अंडोरे या तीनही खेळाडूंनी पाहिले तीन क्रमांक मिळवीत या प्रकारावर आपला संपूर्ण हक्क प्रस्थापित केला. याचप्रमाणे महिलांमध्ये व्ही. डी. के. स्पोर्ट्स फौंडेशनची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू श्रावणी सांगळे हीने आपल्यालौकिकस साजेशीधाव घेत काल ४०० मेटरचे विजेतेपद मिळविले होते. तर, आजही अश्याच प्रकारे पुन्हा सुंदर धाव घेत ४०० मीटर हर्डल्स या प्रकारात हे अंतर १.०९.१६ मिनिटात पूर्ण करून दुहेरी मुकुट आपल्या नांवे केला. महिलांच्या ८०० मीटर धावणे प्रकारात दिंडोरीच्या रेखा शेवरे हीने हे अंतर २. २१. ६३ मिनिटात पूर्ण करून विजेतेपद पटकावले. तर दिशा बोरसे हीने दुसरा क्रमांक मिळविला. १५०० मीटर प्रकारात दिशा बोरसे हीने हे आंतर ०५. ०५. ६८ मिनिटात पूर्ण करून विजेतेपद मिळविले. महिलांच्या ५००० मिटर धावणेके. टी. एच. एम. कॉलेजच्या रविना गायकवाडने सर्वात वेगवान धाव घेत हे आंतर १८.२६.२० मिनिटांमध्ये पूर्ण करून प्रथम स्थान मिळविले. तर याच प्रकारे १०,००० मीटर धावणे ही शर्यत ३०.००.९१ मिनिटात पूर्ण करून या दोन्हीही लांब पाल्याच्या शर्यतीत आपले वर्चस्व सिद्ध करून दुहेरी यश संपादन केले. महिलांच्या लांब उडी प्रकारात त्र्यंबकराज क्लबच्या प्रियांका भामरेने प्रथम क्रमांक मिळविला. महिलांच्या गोळा फेक प्रकारात गिरीराज क्लबच्या हामंगी पंडित हीने १०.७९ मिटर लांब गोळा फेकून प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेतही कामगिरीच्या आधारेआणि महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार खेळाडूंची जिल्हा संघामध्ये निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू जूनच्या तिसऱ्या आठवड्यात आयोजित राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande