रायपूर, 20 जून (हिं.स.) : छत्तीसगडच्या केर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज शुक्रवारी जोरदार चकमक झाली. जिल्ह्यातील छोटेबेटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धुमश्चक्री उडाली असून यात एका महिला नक्षलवादी ठार झाली आहे. कांकेरचे पोलीस अधीक्षक आय.के. एलिसेला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलीचे नाव शांती देवे असे आहे. तिच्यावर तब्बल 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गेल्या 18 महिन्यात छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत 412 नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये सीपीआयएमचा सरचीटणीस बसवराजु, गगन्ना आणि गौतम सुधाकर यांचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या छत्तीसगड दौऱ्याच्या एक दिवस आधी झालेल्या चकमकीत शांती देवे ठार झाली असून याद्वारे सुरक्षा दलांनी मोठा संदेश दिला आहे. -----------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी