चेन्नई, 1 जुलै, (हिं.स.) - तामिळनाडूतील
शिवकाशी येथील एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर
४ जण गंभीर भाजले आहेत.आणखी काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात
आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी विरुधुनगर सरकारी रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे.
विरुधुनगर
जिल्ह्याचे एसपी कन्नन यांनी सांगितले की, शिवकाशीजवळील
चिन्नकमानपट्टी गावात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. अपघातानंतर
कारखान्यातून सतत धूर निघताना दिसत होता आणि आतून फटाके फुटण्याचे आवाज ऐकू येत
होते. घटनेची चौकशी सुरू आहे.
प्राथमिक
तपासानुसार, फटाके बनवणाऱ्या कारखान्यात रसायने
मिसळण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला. रसायने मिसळताना घर्षण झाल्यामुळे आग
लागली आणि काही वेळातच कारखान्यात स्फोट झाला, असा
अंदाज आहे. आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या गावातील लोकही घाबरले.स्फोट खूप मोठा असल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना
सावरण्याची संधी मिळाली नाही. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी
पोहोचून तातडीने बचावकार्य सुरू केले. पण तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra