मोटारसायकल चोरास शिताफीने ४८ तासात अटक; नेरळ पोलिसांची कारवाई
रायगड, 20 जून, (हिं.स.)। नेरळ येथील धबधब्यावर गेलेल्या पर्यटकाची मोटर सायकल ही चोरीस गेली होती. त्या अनुषंगाने त्याने नेरळ पोलीस तहेने येथे रितसर तक्रार दाखल केली. गुन्हा रजि.नं.93/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 303(2) हा गुन्हा दिनांक 18/06/2025 घडला
मोटारसायकल चोरास शिताफीने ४८ तासात अटक


रायगड, 20 जून, (हिं.स.)। नेरळ येथील धबधब्यावर गेलेल्या पर्यटकाची मोटर सायकल ही चोरीस गेली होती. त्या अनुषंगाने त्याने नेरळ पोलीस तहेने येथे रितसर तक्रार दाखल केली. गुन्हा रजि.नं.93/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 303(2) हा गुन्हा दिनांक 18/06/2025 घडला होता. नेरळ पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी ज्या रोड ने गेला तेथील नेरळ ते उल्हासनगर रोडवरील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करुन गोपनीय माहिती घेवून त्यास शोधून ताब्यात घेतले.

आरोपी यांचे नाव पंकज प्र. कांबळे, वय-18 वर्षे 10 महिने रा.महात्मा जोतिबा फुले नगर, यूएमसी रोड, उल्हासनगर असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

सदर चा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी नेरळ पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व गुन्हे प्रकटीकरण पथक नेरळ चे PSI संदीप फड,पोहवा सचिन वाघमारे, पोलीस शिपाई अश्रू बेंद्रे , राजाभाऊ केकान, निरंजन दवणे, विनोद वांगणेकर यांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सचिन वाघमारे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant


 rajesh pande