संत तुकाराम आणि माऊलींची पालखी पुण्यात दाखल
पुणे, 20 जून (हिं.स.) : राम कृष्ण हरीच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमून गेली आहे. देहूतून संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यासाठी रवाना झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आपला दुसरा मुक्
संभाजी भिडे संग्रहित फोटो


पुणे, 20 जून (हिं.स.) :

राम कृष्ण हरीच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमून गेली आहे. देहूतून संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यासाठी रवाना झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आपला दुसरा मुक्काम आटोपून पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.

दापोडी येथे दुपारचा मुक्काम करून सोहळा चार वाजताच्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल झाली आणि पुण्यातील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचा दोन मुक्काम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फुलेनगर येथे पालखी सोहळा दुपारचा विसावा घेऊन दुपारी 4 वाजेच्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल झाली

पुण्याच्या एबीसी चौकातील संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पोलीस मुख्यालयाच्या पुढे आली आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी फर्ग्युशन कॉलेज गेट ओलांडून पुढे गेली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संगमवाडी पुल येथून मार्गस्थ झाली. दोन्ही पालख्यां बरोबर मोठ्या संख्येने भाविक आहेत.

यंदा जवळपास 250 पेक्षा जास्त वारकरी दिंड्यांनी वारीत सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी हा आकडा 150 ते 170 पर्यंत होता. अशा स्थितीत 250 पेक्षा जास्त दिंड्या असलेली ही पहिलीच वारी ठरली आहे. तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेनं जात असताना प्रशासनानं वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. तसेच, शहरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande