देवरूखच्या श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन
रत्नागिरी, 20 जून, (हिं. स.) : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे शनिवारी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. योग साधना ही मानवाला शरीर व मानवाची मलीनता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. निरोगी आणि निसर्गानुकूल जीवन ज
देव रूखचे सद्गुरू लोकमान्य वाचनालय


रत्नागिरी, 20 जून, (हिं. स.) : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे शनिवारी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

योग साधना ही मानवाला शरीर व मानवाची मलीनता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. निरोगी आणि निसर्गानुकूल जीवन जगण्यासाठी योग ही एक जीवन पद्धती आहे. यासाठीच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे योगाभ्यास आणि योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात योगशिक्षक अशोक कुमटेकर आणि सौ. शीतल पंडित यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच प्रात्यक्षिकात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी योग्य वेशात व कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तीन तास अगोदर काही न खाता यावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande