नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेसाठी प्रवेश यादी जाहीर
नवी दिल्ली, 7 जून (हिं.स.) भारतामध्ये ५ जुलैपासून नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा रंगणार आहे. भारतात होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा आहे. बंगळुरुच्या कांतीरवा स्टेडियमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या
नीरज चोप्रा


नवी दिल्ली, 7 जून (हिं.स.) भारतामध्ये ५ जुलैपासून नीरज चोप्रा क्लासिक

स्पर्धा रंगणार आहे. भारतात होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा आहे.

बंगळुरुच्या कांतीरवा स्टेडियमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भालाफेकपटूंची नुकतीच यादी जाहीर करण्यात आली आहे. जपानच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत

कांस्यपदक विजेत्या गेन्की डीनची जागा चेक प्रजासत्ताकच्या मार्टिन कोनेकनीने

घेतली आहे.आयोजकांनी

शुक्रवारी एकूण १२ खेळाडूंची अंतिम प्रवेश यादी जाहीर केली.

कोनेक्नी व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय

खेळाडूंमध्ये दोन वेळेचा विश्वविजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, २०१६ ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता थॉमस रोहलर

(जर्मनी), २०१५ विश्वविजेता ज्युलियस येगो

(केनिया), कर्टिस थॉम्पसन (यूएसए), लुईझ मॉरिसियो दा सिल्वा (ब्राझील) आणि

श्रीलंकेचा रुमेश पाथिरेज यांचा समावेश असेल. तर भारताकडून नीरज चोप्राबरोबर आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेता सचिन यादव, किशोर जेना, रोहित

यादव आणि साहिल सिलवाल सहभागी होणार आहेत.

२४

मे रोजी पंचकुला येथे ही स्पर्धा होणार होती. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी

तणावामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि

जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. या स्पर्धेला अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने

मान्यताही दिली आहे. त्यातप्रमाणे जागतिक अ‍ॅथलेटिक्सने श्रेणी-अ दर्जा या स्पर्धेला

दिला आहे.

या

स्पर्धेसाठी तिकिटांच्या किमती १९९ ते ९,९९९

पर्यंत असतील. १५ जणांची क्षमता असलेल्या कॉर्पोरेट बॉक्सची किंमत ४४,९९९ आहे. थ्रोअर्स रनवेजवळील विशेष स्टँड ९,९९९ मध्ये उपलब्ध असेल आणि नॉर्थ अप्पर

स्टँडमधील रनवेच्या मागे असलेला प्रीमियम सेक्शन २,९९९ मध्ये उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या

स्पर्धेचं आयोजन करत नीरज

चोप्राचे ध्येय भारताला जागतिक दर्जाच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांचे विश्वसनीय यजमान

बनवणे आहे. आणि त्या दृष्टीने ही स्पर्धा एक ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande