डब्ल्यूएफआयची ३० कुस्तीपटूंवर तात्पुरती निलंबनाची कारवाई
नवी दिल्ली, 07 जून (हिं.स.): भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) जवळपास ३० कुस्तीपटूंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. डब्ल्यूएफआयने या कुस्तीपटूंना तात्पुरते निलंबित करत ज्युनियर स्पर्धांमध्येखेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ज्युनियर स्तर
कुस्ती फेडरेशन लोगो


नवी दिल्ली, 07 जून (हिं.स.): भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) जवळपास ३० कुस्तीपटूंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. डब्ल्यूएफआयने या कुस्तीपटूंना तात्पुरते निलंबित करत ज्युनियर स्पर्धांमध्येखेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्युनियर स्तरावर होणाऱ्या स्पर्थांमध्ये वयस्कर कुस्तीपटूंवर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघानेगेल्या महिन्यात ४०० हून अधिक प्रकरणांची चौकशी केल्यानंतर त्यापैकी ३० जणांना तात्पुरते निलंबित केले आहे. डब्ल्यूएफआयने दिल्लीतील कुस्तीच्या आखाड्यां'तील प्रशिक्षक आणि कुस्तीपटूंच्या तक्रारींवरून ही कारवाई केली आहे. ज्यात हरियाणातील अनेक कुस्तीपटूंनी राष्ट्रीय राजधानीत जन्मलेले आणि ज्युनियर स्तरांवरील स्पर्धांमध्ये पात्र असल्याचे दाखवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली आहेत. दरम्यान,बिहारमध्ये अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धांमध्ये दोन वयस्कर कुस्तीपटूंनी पदके जिंकली होती. WFI ने केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारांवर अंकुश ठेवण्यात निश्चितच दत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande