मनमाड : महिलेला प्रलोभने दाखवीत ३० लाखांची फसवणूक
मनमाड, 7 जून (हिं.स.) : पतीच्या मृत्यूनंतर मिळालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी आलेल्या पत्नीस विविध प्रलोभने दाखवीत ३० लाख ७९ हजारांना फसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मनमाड शाखेत उघडकीस आला आहे. या प्र
एफआयआर लोगो


मनमाड, 7 जून (हिं.स.) : पतीच्या मृत्यूनंतर मिळालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी आलेल्या पत्नीस विविध प्रलोभने दाखवीत ३० लाख ७९ हजारांना फसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मनमाड शाखेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारतीय अन्न महामंडळातील मयत कर्मचारी बाळू सोनवणे यांच्या पत्नी रत्ना सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली असून, मनमाड पोलिसांनी बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अन्न महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी बाळू सोनवणे यांचे १३ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले. त्यानंतर रत्ना सोनवणे यांनी त्यांच्या पतीचे भविष्य निर्वाह निधीचे व ग्रॅच्युइटीचे सुमारे ३० लाख ७९ हजार रुपये स्टेट बँकेच्या खात्यात जमा केले. त्यावेळी आपल्या मुलांना तत्कालीन शाखा व्यवस्थापक नाईक व हितेश शर्मा यांनी विविध प्रलोभने दाखवत त्यांच्या नावे काही रक्कम इन्शुरन्समध्ये गुंतवली. तर, काही फिक्स डिपॉझिटमध्ये टाकली. त्यानंतर तारखा नसलेल्या कोऱ्या धनादेशांवर रत्ना सोनवणे यांच्या सह्या घेण्यात आल्या. बँक कारभाराबाबत अनभिज्ञ असण्याचा गैरफायदा घेत संश्यित शर्मा याने ३० लाख ७९ हजारांचे धनादेश वेगवेगळ्या इसमांच्या नावे या काळात वर्ग करून घेतले. संशयित हितेश शर्माकडे विचारणा केली असता, त्याने याबाबत नोटरी करून प्रारंभी पाच लाख रूपये देण्याचे मान्य केले. मात्र, पैसे मिळाले नाहीत. ३ मार्च २०२५ रोजी त्याच्या घरी जाऊन रकमेची मागणी केली असता, शर्मा याने धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी नाईक, कॅशिअर तसेच 'एस.बी.आय. लाइफ' चे हितेश शर्मा या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत भंगाळे तपास करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande