आयपीएल आणि प्रो-कबड्डी लीगनंतर बास्केटबॉल लीगही रंगणार
नवी दिल्ली, 7 जून (हिं.स.)। भारतात इंडियन प्रिमियर लीगला सुरुवात झाली. आणि अवघ्या काही काळातच क्रीडाप्रेमींना या लीगची भुरळ पडली. आयपीएलला अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतर प्रो-कबड्डी लीगलाही सुरुवात झाली. आता या दोन्ही लीगची लोकप्रिय
बास्केटबॉल लीग


नवी दिल्ली, 7 जून (हिं.स.)।

भारतात इंडियन प्रिमियर लीगला सुरुवात झाली. आणि

अवघ्या काही काळातच क्रीडाप्रेमींना या लीगची भुरळ पडली. आयपीएलला अफाट लोकप्रियता

मिळाल्यानंतर प्रो-कबड्डी लीगलाही सुरुवात झाली. आता या दोन्ही लीगची लोकप्रियता

पाहता बीएफआय म्हणजे बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी एसीजी

स्पोर्ट्सच्या भागीदारीत पुरुष आणि महिलांसाठीच्या व्यावसायिक लीगची घोषणा केली.

ऑस्ट्रेलियाच्या

राष्ट्रीय बास्केटबॉल लीगचे माजी सीईओ आणि कमिशनर जेरेमी लोएलिगर एसीजी स्पोर्ट्सचे

संचालक म्हणून या लीगच्या विकासाचे प्रभारी असतील. दरम्यान,बीएफआयचे अध्यक्ष, आधव अर्जुन यांनी या घोषणेनंतर आनंद व्यक्त केला

आहे. यातून भारतीय बास्केटबॉलचा प्रसार होण्यातच मदत होणार असल्याचं त्यांनी

यावेळी सांगतिलं. तर एसीजीचे व्यवस्थापकीय संचालक, करण सिंग यांनी स्पष्ट केले की, बास्केटबॉल हा केवळ एका खेळाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर ते एक संधी

निर्माण करण्याचे साधनही आहे.

भारतात

बास्केटबॉल लीग सुरु झाल्याने तळागाळातील बास्केटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर

आपला खेळ दाखविण्यासाठी या निमित्ताने एक नवं व्यासपीठ मिळणार आहे. तसंच क्रिकेट,

कबड्डीप्रमाणे भारतात बास्केटबॉलकडे तरुणाईचा कल वाढणायसही या निमित्ताने मदत

होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande