टोटेनहॅमने युरोपियन लीग जिंकूनही केली प्रशिक्षकाची हकालपट्टी
लंडन, 7 जून (हिं.स.) युरोपा लीग २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर काही दिवसांतच टोटेनहॅम हॉटस्परने त्यांचे मुख्य प्रशिक्षक अँजे पोस्टेकोग्लू यांची प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी केली आहे. क्लबने अधिकृत निवेदनात या निर्णयाची पुष्टी
टोटेनहॅम


लंडन, 7 जून (हिं.स.) युरोपा

लीग २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर काही दिवसांतच टोटेनहॅम हॉटस्परने त्यांचे

मुख्य प्रशिक्षक अँजे पोस्टेकोग्लू यांची प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी केली आहे.

क्लबने अधिकृत निवेदनात या निर्णयाची पुष्टी केली आहे की, कामगिरीचा आढावा आणि गंभीर विचारविनिमय

केल्यानंतर, क्लब अँजे पोस्टेकोग्लू यांना

त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेत आहे.’’

२२

मे रोजी, टोटेनहॅमने मँचेस्टर युनायटेडचा १-०

असा पराभव करून युरोपा लीगचे विजेतेपद जिंकले. गेल्या १७ वर्षांतील हे क्लबचे

पहिले मोठे विजेतेपद होते. या ऐतिहासिक विजयानंतरही, पोस्टेकोग्लू यांना प्रशिक्षकपादवरुन हटवण्यात आले आहे.

टोटेनहॅमची २०२४-२५ च्या प्रीमियर लीगमधील कामगिरी अतिश सुमार

दर्जाची झाली होती. हा क्लब लीगमध्ये गुणतालिकेत १७ व्या स्थानावर राहिला आणि ३८

सामन्यांमध्ये फक्त ३८ गुण मिळवू शकला.

क्लबच्या

निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही

अँजे यांनी आतापर्यंत जे योगदान दिले त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. युरोपा लीग

जिंकणे हा क्लबसाठी एक अविस्मरणीय क्षण होता.असं

असलं तरी, केवळ भावनेच्या आधारे आम्ही भविष्याचा निर्णय घेऊ शकत नाही. बोर्डाने

एकमताने निर्णय घेतला आहे की, क्लबच्या हितासाठी बदल आवश्यक आहे.

पोस्टेकोग्लू

हे २०२३ मध्ये सेल्टिककडून टोटेनहॅम क्लबला मार्गदर्शन करण्यास तयार झाले होते. चार

वर्षांसाठी त्यांचा टोटेनहॅम क्लबशी करार झाला होता. मात्र, दोन वर्षांमध्ये पोस्टेकोग्लू

यांना या संघाच्या पदावरुन हटवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande