हिंदी सक्तीवरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा उद्धव ठाकरेंना टोला
अकोला, 1 जुलै (हिं.स.)। हिंदी सक्ती करावी हा मसनेकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी स्वीकारला होता तर त्यांच्या स्वाक्षरीने हिंदी पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत सक्तीची करावी याला मान्यता उद्धव ठाकरे यांनी दिली होती तर मुंबई
हिंदी सक्तीवरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा उद्धव ठाकरेंना टोला


अकोला, 1 जुलै (हिं.स.)।

हिंदी सक्ती करावी हा मसनेकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी स्वीकारला होता तर त्यांच्या स्वाक्षरीने हिंदी पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत सक्तीची करावी याला मान्यता उद्धव ठाकरे यांनी दिली होती तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरिता मराठी माणसाची सहानुभूती मिळवण्यासाठी राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली असल्याची खोचक टीका केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. ते आज आपल्या अकोला दौरा दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. तर दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकीत सोबत येतील नाही येतील हा त्यांचा प्रश्न असून महायुती ही निवडणूक जिंकणार असल्याचं ते म्हणाले. ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग करिता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गाकरिता शेतकरी स्वतः जमीन देतील आणि राज्य सरकारही या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande