पीक विमा योजनेतील बदलामुळे शेतकऱ्यांची लूट; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निवेदन
अकोला, 1 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान पीक विमा योजनेतील बदल हे शेतक-यांच्या हिताचे नसून कंपनीच्या फायद्याचे असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. तसं निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलं आहे. पुर्वी प
P


अकोला, 1 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान पीक विमा योजनेतील बदल हे शेतक-यांच्या हिताचे नसून कंपनीच्या फायद्याचे असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. तसं निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलं आहे.

पुर्वी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतक-यांना वैयक्तीक तक्रारी करण्याचे अधिकार होते. परंतू, आता ते अधिकार काढुन घेण्यात आल्यामुळे आता हि पीक विमा योजना फक्त शेतक-यांना लुटण्यासाठीची योजना राहली आहे. त्यामुळे सदर योजना बंद करून जे अनुदान केंद्र व राज्य सरकार विमा कंपनीला देते ते अनुदान व तेवढेच अनुदान वाढीव राज्य सरकारकडुन देवून शेतक-यांना थेट बँक खात्यात जमा केल्यास त्याचा लाम शेतक-यांना शेती उपयोगी कार्यासाठी निश्चीतच होईल. या मागणीचे निवेदन आज अकोला जिल्हाधिकारी यांना क्रांतिकारी शेतकरी संघटने तर्फे देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande