अकोला, 1 जुलै (हिं.स.)। रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने दिनांक 17 जून रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे परीक्षा नियंत्रक डॉ.नितीन कोळी यांना निवेदनाद्वारे एल.एल.बी.-अंतिम वर्षातील अंतिम सेमिस्टर चे व इतर शाखेतील विद्यार्थ्यांचे अंतिम सेमिस्टर चे निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती.विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अडचणी येऊ नये म्हणून हि मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस आकाश हिवराळे यांनी लावून धरली होती.
सदर मागणीची दखल घेत 1 जुलै 2025 रोजी सायंकाळी एल.एल.बी. -अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले असून इतरही शाखेचे अनुक्रमे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा सांगण्यात आले आहे.सदर तात्काळ निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून विद्यार्थ्यां मध्ये उत्साही वातावरण आहे.यामुळे विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे