अकोला - महामार्गावर भीषण अपघात
अकोला, 1 जुलै, (हिं.स.) - राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला. गुजरातहून नागपूरकडे माती घेऊन जाणारा मोठा कंटेनर (क्र. जीजे-12-बीझेड-9965) अचानक पलटी झाला. अपघात इतका भयानक व धास्ती
P


अकोला, 1 जुलै, (हिं.स.) - राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला. गुजरातहून नागपूरकडे माती घेऊन जाणारा मोठा कंटेनर (क्र. जीजे-12-बीझेड-9965) अचानक पलटी झाला. अपघात इतका भयानक व धास्तीजनक होता की दृश्य पाहून अंगावर शहारे यावेत.

समोर अचानक ऑटो व दुचाकी आल्याने चालकाने ब्रेक मारले आणि वाहनावर नियंत्रण सुटले. कंटेनर थेट महामार्गावर उलटून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक तासाभरासाठी पूर्ण ठप्प झाली. कंटेनरमध्ये माती भरलेली होती. धूळ उडताच स्थानिक नागरिकांची गर्दी झाली आणि काही अफवांमुळे लुटीचा प्रयत्न केला गेला. काही समाजकंटकांनी ट्रकमध्ये मौल्यवान माल असल्याचा गैरसमज करून चालकावर वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कंटेनरमध्ये माती असल्याचे समजताच गर्दी शांत झाली.घटनास्थळी 1033 राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल झाली. एकनाथ इगळे, ओम खाडे, हर्षल गीरे, सुमित गीरे, ऋषिकेश भाकरे यांनी मदतकार्य सुरू केले. पो.ठाणेदार वैशाली मुळे, ए.एस.आय जामनिक, पो.कॉ. इंगोले, गुजर, कांदे, आगरकर यांनी कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत केली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरीही घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande