अमरावती, 1 जुलै (हिं.स.)
पूर व अतिवृष्टीमुळे संपर्क तुटणाऱ्या मेळघाटातील १६ गावांकरिता सीईओ संजिता महापात्र अॅक्शनमोडवर आहेत. तेथे सुविधांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या गावातील अतिजोखीम असलेल्या गरोधर महिलांना इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी मेळघाटातील चोपन, कोकमार, तांगडा, परसोली, किन्नीखेडा, कुंड, ढोकडा, माढिझडप, बिच्चूखेडा, बोधु, बोराट्याखेडा, रक्षा, कूही, कुटिंडा व डोमी या १६ गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटतो. त्यामुळे सीईओंच्या आदेशावरुन या गावांमध्ये तीन महिन्याची आरोग्याची किट तयार करून तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे नियोजन केले आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पथक देखील सक्रिय करण्यात आल्याची माहिती सीईओ संजिता महापात्र यांनी दिली. येथील अधिकारी, कर्मचारी मुख्यालय सोडणार नसून या गावातील अति जोखमीचे रुग्ण आणि गरोदर माता यांना इतरत्र हलविण्यात आले आहेत. तसेच या गावाला जोडणारे पुल उंच करण्याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सीईओंनी सांगितले.
याशिवाय पावसाळा लक्षात घेता, शिकस्त शाळाची दुरुस्तीला प्रधान्य दिल्या जात आहे. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थीनींची अधिक संख्या आहे, त्या शाळांमध्ये प्राधाण्यांने सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सीईओ म्हणाल्या.
एकाच कामाचे दोनदा वाटप जिल्हा परिषदेव्दारे ग्रामपंचायतींना कामेदिली जाते. परंतु ग्रामपंचायतींकडे बांधकामाची यंत्रना नसल्याने त्या कामांची पुन्हा त्यांच्यास्तरावर निविदा काढली जाते. एकच काम दोनदा वाटल्या जात असल्याने सीईओ संजिता महापात्र यांनी खंत व्यक्त केली. ही पध्दत बदलायला हवी, थेट येथूनच कामाची पध्दत सुरू करण्याबाबत सीईओंनी मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी