चंद्रपूर : विकसित महाराष्ट्र -2047 च्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
चंद्रपूर, 1 जुलै (हिं.स.)। विकसित महाराष्ट्र -2047 च्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये
चंद्रपूर : विकसित महाराष्ट्र -2047 च्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन


चंद्रपूर, 1 जुलै (हिं.स.)। विकसित महाराष्ट्र -2047 च्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र - 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश आहे.

विकसित महाराष्ट्र - 2047 च्या नागरिक सर्वेक्षणाऱ्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेबद्दल आपले अभिप्राय सूचित करण्यात यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande