चंद्रपूर मनपामध्ये ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरु
चंद्रपूर, 1 जुलै (हिं.स.)। प्रशासकीय कारभार गतीमान आणि पेपर लेस करण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिकेने ''ई-ऑफीस प्रणाली'' कार्यान्वित केली असुन जी कामे ऑफलाईन पद्धतीने आतापर्यंत सुरु होती ती आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. यामुळे मनपात येणा
चंद्रपूर मनपामध्ये ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरु


चंद्रपूर, 1 जुलै (हिं.स.)। प्रशासकीय कारभार गतीमान आणि पेपर लेस करण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिकेने 'ई-ऑफीस प्रणाली' कार्यान्वित केली असुन जी कामे ऑफलाईन पद्धतीने आतापर्यंत सुरु होती ती आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. यामुळे मनपात येणाऱ्या सर्व कागदपत्रांचे डिजीटल ट्रॅकिंग करणे आता शक्य होणार आहे. आतापर्यंत मनपात 649 फाईल या ई-ऑफीस प्रणालीवर ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

100 दिवस कृती आराखडा मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्य शासनाद्वारे (Future Roadmap) भविष्यातील वाटचाल अंतर्गत विकसित महाराष्ट्र, ई गव्हर्नन्स रिफॉर्म्स व सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या 3 मुद्द्यांवर केंद्रीत 150 दिवसांची मोहीम 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सुरु करण्यात आली आहे. यात ऑनलाईन पद्धतीने जलद गतीने कामे करण्यास प्राधान्य देण्यात येत असुन प्रत्येक शासकीय कार्यालयात ई ऑफीसचा वापर सुरु करण्यात येत आहे.

महानगरपालिकेत दररोज मोठ्या प्रमाणात टपालांची आवक जावक नोंद होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हस्ते पारंपारीक पद्धत टपाल संबंधित विभागाच्या टेबलवर पोहचवले जाते. त्यामुळे अनेकदा टपाल विभागप्रमुखांपर्यंत पोहचायला उशीर लागतो तर कधी कधी टपाल गहाळ होण्याचाही धोका असतो. त्यामुळे या सर्व प्रकाराला पायबंद घालतानाच ई ऑफीस प्रणाली सुरू करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल हे आग्रही होते. मनपाच्या सर्व विभागांनी आता ई प्रणालीचा वापर सुरु केल्याने आलेल्या तक्रारींचे डिजीटल ट्रॅकिंग शक्य होणार असुन मनपाचे सर्व विभाग या प्रणालीशी जोडले जाऊन आता मनुष्यबळ, वेळ आणि कागदावरील खर्चही वाचणार आहे.

काय आहे ई ऑफीस प्रणाली -

ई – ऑफिस प्रणाली म्हणजे शासकीय कामकाज कागदविरहित (पेपरलेस) करणे. सध्या शासनात फायलींचा प्रदीर्घ प्रवास होतो. त्याऐवजी संगणकावरून अधिकाधिक कामकाज करण्यात येणार. मनपाच्या आवक-जावक कक्षात आवक-जावकची ई ऑफीस प्रणालीवर स्कॅनिंग करून नोंद केली जाईल. पोहच देताना त्यावर ऑनलाईन नोंद झालेला डिजीटल क्रमांकही असेल, त्यामुळे या क्रमांकावरूनच आपल्या तक्रारीची, इतर अर्जाचे पुढे काय झाले, हे ट्रॅकिंग करणे सुलभ होणार आहे. संबंधित टपाल हे ज्या त्या विभागाकडे पाठविले जाईल तिथुन विभागप्रमुख आणि त्या पुढे आवश्यतेनुसार उपायुक्त,अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्याकडे संबंधित फाईल संगणकावरूनच पुढे पाठविली जाईल.

विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

महानगरपालिका क्षेत्रात ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या सूचनांनुसार, मनपा स्तरावरील कार्यालयांमध्ये तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande