हिवरे बाजारमध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण
अहिल्यानगर दि. 1 जुलै (हिं.स.) :- जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलै रोजी आदर्श गाव हिवरे बाजार येथे ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू झाली आहे. मातृस्मृती वनमंदिर परिसरात पार पडलेल्या वृक्षारोपण क
हिवरे बाजारमध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण


अहिल्यानगर दि. 1 जुलै (हिं.स.) :- जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलै रोजी आदर्श गाव हिवरे बाजार येथे ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू झाली आहे. मातृस्मृती वनमंदिर परिसरात पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे,शिक्षणाधि कारी (माध्यमिक) संध्या गायकवाड आणि विभागीय वन अधिकारी संजय कंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना उपस्थित अधिकाऱ्यांनी हिवरे बाजारच्या सातत्यपूर्ण ग्रामविकास उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande