नाशिक, 1 जुलै, (हिं.स.)। हिंदी सक्ती रद्द झाल्यानंतर ५ जुलै रोजी होत असलेल्या सर्वपक्षीय विजयी मेळाव्याच्या निमित्ताने सर्वच विरोधी पक्षांनी - एकत्र येवून सरकारला आपली ताकद दाखवावी व यापुढेही ही एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार महाविकास आघाडीसह - मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शिवसेना, 'मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, माकपा पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना खा. वाजे यांनी मराठी माणसाची आणि ठाकरे ब्रँडच्या एकजुटीमुले सरकारला झुकावे लागले असून, एकजूट असली की काय होऊ शकते त्याची झलक दिसली आहे. आगामी काळात अशीच एकजूट आपली असली तर कोणीच आपल्याला रोखू शकत नाही. येणाऱ्या काळात सरकारचे असे काही निर्णय असो की मग निवडणूका असोत आपल्याला कोणीच रोखू शकत नाही असेही खासदार वाजे म्हणाले
कुंभमेळा प्रायव्हेट लिमिटेड
यावेळी कुंभमेळाबाबत बोलताना खासदार वाजे यांनी कुंभमेळ्याचा विषय काढून कुंभमेळा म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड होताना दिसत आहे. विरोधी पक्ष सोडा स्वपक्षाच्या आमदारांनाही विश्वासात घेतले जात नाही. कुंभमेळा हा कोणाचा खासगी नसून नाशिकरांचा कुंभमेळा आहे. नाशिककर त्याच आदरातिथ्य करतील. त्यामुळे आता आहे अशीच एकजूट ठेऊन लढलो तर कुंभमेला नाशिकरांचा करता येईल. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, दत्ता गायकवाड, मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील, सलीम शेख, सुदाम कोंबड़े आदींनीही मार्गदर्शन केले.
बैठकीस शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, वसंत गिते, विनायक पोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माकपचे तानाजी जायभावे, सुजाता डेरे, स्वाती भामरे, संजय चव्हाण, बाला कोकणे, महेंद्र बडवे, सहुल दराडे, किशोर दलोड, सचिन बांडे, चबलू खखैरे, अस्लम मणिधार, मसूद जीलानी, दिलीप मोरे आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI