'अलायन्स एअर' ची अमरावती-मुंबई फ्लाईट आता आठवड्यातून दोनच दिवस ?
अमरावती, 1 जुलै, (हिं.स.) अलायन्स एअरची अमरावती-मुंबई-अमरावती ही विमानसेवा, जी पूर्वी आठवड्यातून तीन वेळा होती. ती आता आठवड्यातूनफक्त दोन दिवसच चालणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरने या
आता आठवड्यातून दोनच दिवस मुंबई फ्लाईट !  'अलायन्स एअर' ची तयारी सुरु अमरावतीकरांना फसवणूक झाल्याचा अनुभव


अमरावती, 1 जुलै, (हिं.स.) अलायन्स एअरची अमरावती-मुंबई-अमरावती ही विमानसेवा, जी पूर्वी आठवड्यातून तीन वेळा होती. ती आता आठवड्यातूनफक्त दोन दिवसच चालणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरने या संदर्भात आपली तयारी सुरु केली असून लवकरच घोषणा केली जाईल. या बातमीमुळे अमरावतीकरांना आपली फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे.

उल्लेखनीय असे की, अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवा, मोठ्या जडमनाने सुरु करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच बंद पडण्याचा धोका होता. प्रथम, पहिल्य दिवसापासूनच वेळेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. अमरावतीच्या लोकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फ्लाईटच्या वेळेबद्दल चिता व्यक्त केली होती. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर वेळेत बदल केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.

यानंतर, विमानात पेट्रोल भरण्यासाठी वापरण्यात आलेला टँकर चिखलात अडकल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच, या मार्गावरून उड्डाण करणाऱ्या विमानांबद्दल सोशल मीडियासह प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चिता व्यक्त केली जात होती. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर, विमानाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्याच वेळी, विमानात जागा रिकाम्या असूनही जास्त भाडे आकारण्याचा मुद्दा देखील हे विमान बंद करण्याचे संकेत सूचित करत होता.

अमरावती-मुंबई दरम्यान सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस चालणारी विमानसेवा आता आठवड्यातून फक्त दोनदिवसचउड्डाणकरेल. यामुळे अमरावतीतील लोकांना फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे.

अमरावती-मुंबई भाडे २४९९ रुपये निश्चित केले गेले असले तरी ते कधीही ८००० रुपयांपेक्षा कमी झाले नाही. उड्डाणाची वेळ फायदेशीर नसली तरी, लोक या विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. असे असूनही, अलायन्स एअरने उड्डाणांची संख्या कमी करणे म्हणजे विमान कंपनीने अमरावतीच्या नागरिकांशी केलेला विश्वासघात आहे. या मार्गावरील उड्डाणांची संख्या कमी करण्याऐवजी, जर त्याचे वेळापत्रक सुधारले तर ते लोकांसाठी आणि अलायन्स एअरसाठी फायदेशीर ठरेल, अशी लोकांची मागणी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande