अहिल्यानगरच्या श्रीजी ग्रुप ला राष्ट्रीय पातळीचा उत्कृष्ट निर्यातीबद्दलचा स्टार परफॉर्मर अॅवॉर्ड
अहिल्यानगर, 1 जुलै, (हिं.स.) : अहिल्यानगर च्या श्रीजी ग्रुप ला राष्ट्रीय पातळीचा उत्कृष्ट निर्यातीबध्दलचा स्टार परफॉर्मर अॅवॉर्ड मिळाले असून मुंबईच्या बांद्रा येथील ताज होटेलमध्ये आयोजित समारंभात अशिष शेलार यांच्या हस्ते उत्कृष्ट निर्यातीचे पश्चिम मह
अहिल्यानगर च्या श्रीजी ग्रुप ला राष्ट्रीय पातळीचा उत्कृष्ट निर्यातीबध्दलचा स्टार परफॉर्मर अॅवॉर्ड


अहिल्यानगर, 1 जुलै, (हिं.स.) : अहिल्यानगर च्या श्रीजी ग्रुप ला राष्ट्रीय पातळीचा उत्कृष्ट निर्यातीबध्दलचा स्टार परफॉर्मर अॅवॉर्ड मिळाले असून मुंबईच्या बांद्रा येथील ताज होटेलमध्ये आयोजित समारंभात अशिष शेलार यांच्या हस्ते उत्कृष्ट निर्यातीचे पश्चिम महाराष्ट्रा व राष्ट्रीय पातळी वरील दोन अॅवॉर्डस पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अहिल्यानगर औद्योगिक वसाहतीत १९७६ साली सुरू केलेल्या श्रीजी ग्रुपच्या एका छोटयाश्या वृक्षाने आता वटवृक्षात रुपांतर केले असुन अहिल्यानगर मध्ये २ व चैन्नईला एक अशा ३ युनिटद्वारे ४० देशातील विविध साखर कारखान्यांना त्यांना हव्या त्या डिझाईन प्रमाणे व गुणवत्ता पूर्वक निर्मिती करून देणाऱ्या श्री.जी,प्रोसेस इंजि.वर्क्स.लि या ग्रुपला इंजि.एक्स्पोर्ट प्रमोशन कॉन्सिल ऑफ इंडिया मानाचा 2022-2३ या सालचा राष्ट्रीय पातळीचा उत्कृष्ट निर्यातीबध्दलचा 'स्टार परफॉर्मर' अॅवॉर्ड' मुंबईच्या बांद्रा येथील ताज' या पंचतारांकीत होटेलमध्ये विशेष अतिथी आ.अशिष शेलार यांच्या हस्ते व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वित्त.मंत्रालयाचे जाँ.सेक्रेटरी विमलज आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.जी.ग्रुप चे संचालक सागर अग्रवाल यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.याप्रसंगी प्रतिष्ठीत उद्योजक, व्यापारी,उपस्थित होते याच बरोबर दुसऱ्या एका समारंभात श्रीजी ग्रुपला राज्यस्तरीय पश्चिम विभागीय (वेस्टर्न रिजनल) उत्कृष्ट निर्यातीबद्दलचा २०२१ -२२ या सालचा पुरस्कारही राज्याचे डेव्ह. कमिशन ऑफ इंडस्ट्रीज चे आए.ए.एस.ऑफीसर दिपेंद्रसिह कुशवाह यांच्या हस्ते श्रीजी ग्रुपचे चे.एक्स्पोर्ट मॅनेजर जयन नायर याना प्रदान करण्यात आला.श्रीजी इंजि.ग्रुपने येथे युनिट उभारल्या पासुन आज पर्यन्त उत्कृष्ट निर्मिती बरोबर.उत्कृष्ट निर्यातीचे सातत्याने सातत्याने पुरस्कार मिळवले आहेत.

याविषयी बोलताना कंपनीचे संचालक दिनेश अग्रवाल म्हणाले कि अतिशय खडतर परिस्थितीतुन आम्ही उभारले ल्या या कारखान्यातुन साखर कारखान्यांना आवश्यक अशी लागणारी गुणात्मक यंत्रसामुग्रीची निर्मिती करतो.उत्तम यंत्र सामुग्रीच्या माध्यमातुन अचुक व परिणामकारक उत्पादन आमच्याकडे तयार होत असते.गुणवत्तेत कोणतीही तडजोड आजपर्यंत आम्ही केली नसून याचा परिणाम म्हणजे अनेक वषांपासून श्रीजी ग्रुप हा यु.एस.ए,कॅनडा, जंबिया, केनिया, युगांडा,नायजेरिया,सुदान, इंडोनेशिया,व्हिएतनाम,थायलंड, फिलिपिन्स, फिजी आदी सुमारे ४० देशातील विविध साखर कारखान्यांना अतिशय उपयुक्त अश्या मशिनरी ची निर्मिती करून निर्यात करते.महत्वाचे म्हणजे यु.एस.ए.या देशासाठी बॉयलिंग हाऊस व रिफाईन्ड शुगर मशीनरीचा पुरवठा करणारी श्रीजी ही भारतातील एकमेव कंपनी असल्याचे संचालक दिनेश अग्रवाल यांनी अभिमानाने सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande