नंदुरबार : 'सामाजिक न्याय दिन' उत्साहात साजरा
नंदुरबार, 1 जुलै (हिं.स.) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात ‘सामाजिक न्याय दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन
नंदुरबार : 'सामाजिक न्याय दिन' उत्साहात साजरा


नंदुरबार, 1 जुलै (हिं.स.) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सामाजिक न्याय भवनात ‘सामाजिक न्याय दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात

सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती समाज

कल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात समता दिंडीने झाली, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित

व्याख्यान आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृतीपर

कार्यक्रमही घेण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी

पत्रे व लाभांचे वाटप करण्यात आले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती शाहू

महाराज गुणवत्ता पुरस्कार, रमाई आवास योजना, जात वैधता प्रमाणपत्र आणि वसतिगृह प्रवेश पत्र

यांसारख्या योजनांचा समावेश होता. तसेच, 10 वी आणि 12 वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या

विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त, कार्यक्रमात

उपस्थित असलेल्या सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

वक्तृत्व स्पर्धेसाठी रवींद्र बोरसे, प्रवीण सावंत, भरत माळी, आणि माधुरी बोरसे यांनी परीक्षक म्हणून काम

पाहिले.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande