पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
नवी दिल्ली / न्यूयॉर्क, 1 जुलै (हिं.स.) पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान आणि त्यांच्या संरक्षणाखाली लपलेल्या दहशतवाद्यांना कडक इशारा दिला. ते म्हणाले की, पहलगाम दहशतवादी ह
एस जयशंकर


नवी दिल्ली / न्यूयॉर्क, 1 जुलै (हिं.स.)

पहलगाम

दहशतवादी हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान

आणि त्यांच्या संरक्षणाखाली लपलेल्या दहशतवाद्यांना कडक इशारा दिला. ते म्हणाले की,

पहलगाम दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील पर्यटन नष्ट करण्याचा सुनियोजित कट होता. हे

एक प्रकारचे आर्थिक युद्ध असल्याचे ते म्हणाले आहेत. न्यूयॉर्कमधील न्यूजवीकला

दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण कहाणी आणि

त्यानंतरच्या घटना सांगितल्या.

जयशंकर

म्हणाले की, पहलगाम

हल्ला हा एक आर्थिक युद्ध होते. त्यांचा उद्देश अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या

काश्मीरमधील पर्यटन उद्ध्वस्त करणे होता. धार्मिक हिंसाचार भडकवणे हा देखील त्याचा

उद्देश होता.कारण लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले जात होते.

ते म्हणाले, 'म्हणून

आम्ही ठरवले की, दहशतवाद्यांना शिक्षेच्या भीतीशिवाय मुक्तपणे कट रचू देऊ नये. ते

सीमेच्या पलीकडे आहेत आणि म्हणून आपण बदला घेऊ शकत नाही, या कल्पनेला आव्हान देण्याची खूप गरज

होती आणि आम्ही तेच केले.'

भारत

आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणल्याचा दावा केला होता. आता हा दावा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी फोनवर चर्चा केली तेव्हा ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खोलीत उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे

सांगितले की,

व्यापार आणि युद्धबंदीशी संबंधित कोणतीही चर्चा झाली नाही. भारताने पाकिस्तानच्या

धमक्या नाकारल्या आणि दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली.दरम्यान, ट्रम्प यांनी दावा

केला होता की, त्यांनी व्यापारी दबाव आणून भारत आणि पाकिस्तानला युद्धबंदीसाठी भाग

पाडले. याआधीही ते सोशल मीडियाद्वारे असे दावे अनेकदा करत आहेत. ते म्हणाले होते

की, मी

म्हटले होते की जर तुम्ही आपापसात लढलात तर व्यापार होणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande