वर्धा जिल्ह्यात विशेष आर्थिक साक्षरता अभियान
वर्धा, 1 जुलै (हिं.स.)। शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा ग्रामपंचायत स्तरावर लाभ मिळवून देण्यासाठी दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत विशेष आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले
वर्धा जिल्ह्यात विशेष आर्थिक साक्षरता अभियान


वर्धा, 1 जुलै (हिं.स.)। शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा ग्रामपंचायत स्तरावर लाभ मिळवून देण्यासाठी दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत विशेष आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते यांनी केले आहे.

जिल्ह्याची अग्रणी बँक ऑफ इंडिया हि भारत सरकारच्या वित्तीय समावेशन धोरणा अंतर्गत 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या तीन महिन्यादरम्यान हि मोहीम राबविण्यात येणार आहे. हि मोहीम संपूर्ण देशभर राबविल्या जाणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ आजनडोह, आजदा, अंतरगाव, आकोली, आलगाव, नेरी (पु), आमला अश्या ग्राम पंचायत मध्ये आज पार पडणार. या तीन महिन्याच्या कालावधीत सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत नवीन खाते उघडणे तसेच PMJDY अंतर्गत जे खाते बंद झाले असतील असे खाते RE –KYC करण्यात येईल, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना तसेच सोबतच पिक कर्ज नियमित परतफेड केल्यास मिळणारे व्याज सवलतीचा सुद्धा लाभ या साक्षरता अभियान अंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायत पातळीवर बँकामार्फत मिळवून दिल्या जाणार आहे.

विशेष आर्थिक साक्षरता अभियान च्या कॅम्पची माहिती आपल्या नजीकच्या बँकेत, तहसील कार्यालयात, गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध राहील तरी या मेळाव्यास परिसरातील सर्व लोकांनी उपस्थित राहावे व या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन एस. शिरभाते यांनी सांगितले आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande