रविंद्र चव्हाण यांच्या भाजप प्रदेशाध्यक्ष नियुक्ती नंतर कणकवलीत जल्लोष
सिंधुदुर्ग, 1 जुलै, (हिं.स.)। माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कणकवली तालुका भाजपाकडून आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार
रविंद्र चव्हाण यांच्या भाजप प्रदेशाध्यक्ष नियुक्ती नंतर जल्लोष करताना भाजपचे कार्यकर्ते.


सिंधुदुर्ग, 1 जुलै, (हिं.स.)। माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कणकवली तालुका भाजपाकडून आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो … , रविंद्र चव्हाण साहेब , तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है ! अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, भाजप जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, नामदेव जाधव शिशिर परुळेकर, महेश सावंत, प्रदीप गावडे, समीर प्रभूगावकर, सर्वेश दळवी , सचिन पारधीये, लक्ष्मण घाडीगावकर, संदीप सावंत, सुशील सावंत, पप्पू पुजारे प्रज्वल वर्दम, अभय गावकर, संजना सदडेकर, नयन दळवी ,सोमनाथ चव्हाण, सागर राणे, प्रवीण दळवी, गणेश तांबे सादिक कुडाळकर, प्रदीप ढवण, बबन गुरव, प्रशांत राणे, संजय ठाकूर, गणेश तळेगावकर, भाई काणेकर, भाई सावंत, परशुराम झगडे, गुरुदास सावंत, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री म्हणाले , रविंद्र चव्हाण यांची राजकीय वाटचाल सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी आहे. यापुर्वी अनेक पदांना त्यांनी न्याय दिलेला आहे. निश्चितच पुढील काळात त्यांच्या नेतृत्वात शत:प्रतिशत भाजपा निर्माण होईल. प्रज्ञा ढवण म्हणाल्या रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोकणाला बहुमान मिळालेला आहे. त्यांनी मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. परशुराम झगडे म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या निवडीचा फायदा कोकण विकासासाठी होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande