शेख हसीना यांची मुलगी सायमा वाजेद यांना डब्ल्यूएचओने पाठवले सक्तीच्या रजेवर
बर्न, 14 जुलै (हिं.स.) भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मुलगी सायमा वाजेद यांच्यावर जागतिक आरोग्य संघटनेने मोठी कारवाई केली आहे. डब्ल्यूएचओनेसायमा वाजेद यांना सक्तीच्या रजेवर प
सायमा वाजेद


बर्न, 14 जुलै (हिं.स.)

भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देत असलेल्या

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मुलगी सायमा वाजेद यांच्यावर जागतिक

आरोग्य संघटनेने मोठी कारवाई केली आहे. डब्ल्यूएचओनेसायमा वाजेद यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

सायमा या डब्ल्यूएचओच्या आग्नेय आशिया प्रदेशाच्या प्रादेशिक संचालक आहेत.

डब्ल्यूएचओने सांगितले की, डब्ल्यूएचओच्या एसइएआरओच्या

प्रादेशिक संचालक सायमा वाजेद सध्या रजेवर आहेत. या काळात डॉ. कॅथरीना बोहेम

प्रभारी अधिकारी म्हणून काम करतील. सायमा वाजेद यांना रजेवर पाठवण्याचे कारण डब्ल्यूएओने

स्पष्ट केले नाही. डॉ. कॅथरीना बोहेम १५ जुलै रोजी नवी दिल्ली येथील डब्ल्यूएचओ

एसइएआरओच्या कार्यालयात

पोहोचतील अशी अपेक्षा आहे.

डब्ल्यूएचओच्या कारवाईनंतर बांगलादेशच्या अंतरिम सल्लागाराचे

प्रेस सचिव शफीकुल आलम म्हणाले, फसवणूक, बनावटगिरी आणि सत्तेचा गैरवापर या गंभीर

आरोपांच्या चौकशी सुरू असताना, साईमा वाजेद यांना अनिश्चित काळासाठी रजेवर

पाठवण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही हे

जबाबदारीच्या दिशेने एक महत्त्वाचे पहिले पाऊल मानतो.

लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाचा आरोप आहे की, साईमा

वाजेद पुतुल यांनी तत्कालीन पंतप्रधान आणि त्यांच्या आई हसीना यांना बेकायदेशीरपणे

प्रभावित करून भूखंड मिळवून दिला होता. हे नियमांचे उल्लंघन होते. याशिवाय, निवडणूक

आयोगाने वाजेद यांचे राष्ट्रीय ओळखपत्रही लॉक केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande