इगतपुरी : भात लागवडीच्या किचकट कामाला मिळाली यंत्राची जोड
इगतपुरी, 14 जुलै (हिं.स.)। पारंपरिक भात लागवडीला फाटा देत बळीराजाने नव्या कृषी तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. भात लावणीचे काम अतिशय कष्टाचे असून या कामाला कायमच मजुरांची अडचण असते. परिणामी शेतकऱ्यांना त्रास होऊन याचा दुष्परिणाम उत्पन्नावर होतो.
इगतपुरी : भात लागवडीच्या किचकट कामाला मिळाली यंत्राची जोड


इगतपुरी, 14 जुलै (हिं.स.)।

पारंपरिक भात लागवडीला फाटा देत बळीराजाने नव्या कृषी तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. भात लावणीचे काम अतिशय कष्टाचे असून या कामाला कायमच मजुरांची अडचण असते. परिणामी शेतकऱ्यांना त्रास होऊन याचा दुष्परिणाम उत्पन्नावर होतो. ह्या किचकट कामातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी म्हणून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भात लागवड यंत्राची संकल्पना आणली आहे. त्यांच्या संकल्पनेतून इगतपुरी तालुका कृषी विभागाकडून भात उत्पादक शेतकऱ्यांना ह्या यंत्राबाबत माहिती दिली जात आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या स्वयंचलित व मानवचलित भात लावणी यंत्राचा वापर करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते आहे. या यंत्रामुळे गुडघाभर चिखलात भाताची लावणी करण्यापासून शेतकरी व मजुरांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांचा वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याने इगतपुरी तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

भात बहुल इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुकचे शेतकरी रतन विठ्ठल बांबळे, अडसरे खुर्दचे शेतकरी गणपत देवराम मोंढे यांच्या शेतावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत बॅटरी ऑपरेटेड भात लागवड यंत्र व मानवचलित भात लागवड यंत्राचे शेतावरील प्रात्याक्षिक आयोजित करण्यात आले होते.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande