दीपक काटेवर मोक्का अंतर्गत कारवाई करा; मराठा संघटनांची मागणी
पुणे, 14 जुलै (हिं.स.)। अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला हा भ्याड हल्ला असून त्याचा जाहीर निषेध करतो. यामधील प्रमुख दीपक काटे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. तसेच राज्य सरकारने जन सुरक्षा विधेय
दीपक काटेवर मोक्का अंतर्गत कारवाई करा; मराठा संघटनांची मागणी


पुणे, 14 जुलै (हिं.स.)।

अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला हा भ्याड हल्ला असून त्याचा जाहीर निषेध करतो. यामधील प्रमुख दीपक काटे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. तसेच राज्य सरकारने जन सुरक्षा विधेयकाचा पहिला आरोपी दिपकला करावे, अशी मागणी मराठा संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि सर्व मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे केंदीय निरीक्षक विकास पासलकर, मराठा महासंघाचे अजय पाटील, माजी महापौर श्रीकांत शिरोळे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, शिवसंग्रामचे तुषार काकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, माजी महापौर प्रशांत जगताप, सत्यशोधक चळवळीचे प्रतिमा परदेशी यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande