एमएलसी २०२५ : निकोलस पुरनच्या एमआय न्यूयॉर्क संघाला अजिंक्यपद
वॉशिंग्टन डीसी, 14 जुलै (हिं.स.) एमआय न्यूयॉर्कच्या संघाने मेजर लीग क्रिकेट २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामना वॉशिंग्टन फ्रीडम आणि एमआय न्यूयॉर्क यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात एमआय न्यूयॉर्क संघाने प्रथम फलंदा
एमआय न्यूयॉर्क विजेेते


वॉशिंग्टन डीसी, 14 जुलै (हिं.स.)

एमआय

न्यूयॉर्कच्या संघाने मेजर लीग क्रिकेट २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामना

वॉशिंग्टन फ्रीडम आणि एमआय न्यूयॉर्क यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात एमआय

न्यूयॉर्क संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १८० धावा

केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडम संघाला ५ गडी गमावून केवळ

१७५ धावाच करता आल्या. आणि एमआय न्यूयॉर्कने ५ धावांनी अंतिम सामन्यात विजय

मिळवला.

एमआय न्यूयॉर्कने एमएलसी २०२५ चा अंतिम सामना

जिंकत दुसऱ्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. याआधी एमआय न्यूयॉर्कने

२०२३ मध्ये मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावण्याची किमया

साधली होती. २०२४ मध्ये वॉशिंग्टन फ्रीडेनचा संघ चॅम्पियन बनला होता. आता एमआय न्यूयॉर्क

संघाने गतविजेत्याकडून अंतिम सामन्यात विजय हिरावून घेतला आहे.

रुशिल

उगरकर एमआय न्यूयॉर्क संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ४ षटकात ३२ धावा देत

२ फलंदाजांना बाद केले. त्याचप्रमाणे अखेरच्या षटकात वॉशिंग्टन फ्रीडम संघाला विजयासाठी

१२ धावांची आवश्यक होती. त्यावेळी उगरकरने अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत

आपल्या संघाला विजय साकारुन दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande