अथेन्स, 30 जुलै (हिं.स.) ग्रीसमधील
अथेन्स येथे झालेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरदीपने
ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये ११० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.दोन्ही हरदीपने इराणच्या यझदान रेझा डेलरोझचा अंतिम सामन्यात पराभव केला.
पात्रता
फेरीत हरदीपने कझाकस्तानच्या बकातूर सोवेतखानचा २-० असा पराभव केला. अंतिम १६
जणांच्या लढतीत त्याने पोलंडच्या मातेउझ यारोस्लाव टोमेल्काचा ४-२ असा पराभव केला.
त्यानंतर त्याने क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या अनातोली नोवाचेन्कोचा ९-०
असा पराभव केला.
उपांत्य
फेरीतहरदीपने तुर्कीच्या एमरुल्लाह कपकनचा
४-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अखेर ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. हरदीपचा विजय भारतातील तरुण
कुस्तीपटूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra