लंडन, 2 जुलै (हिं.स.)
भारत
आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती
देण्यात आली आहे. त्याच्या जागी आकाश दीपला संघात स्थान देण्यात आले आहे. साई सुदर्शन
आणि शार्दुल ठाकूर देखील या सामन्यात वगळण्यात आले आहे. या दोघांच्या जागी
वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे.
एजबॅस्टन
कसोटी सामन्यात नाणेफेकी दरम्यान भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने ही माहिती
दिली की, बुमराह खेळत नाही आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला विश्रांती देण्यात
आली आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत आम्हाला वाटते की, बुमराहला अंतिम अकरा
संघाता स्थान देऊ. त्याचप्रमाणे आम्ही कुलदीपला संधी देण्याचा विचार केला होता.
पण फलंदाजीबद्दल
खोलवर विचार केल्यानंतर आम्ही
हा निर्णय घेतला असल्याचं त्याने म्हटलं आहे.
भारत
आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ८३
धावा देत पाच विकेट्स घेतल्या. आता दुसऱ्या कसोटीसाठी बुमराहला विश्रांती देण्यात
आली आहे. त्याच्याशिवाय सुदर्शनच्या
अनुपस्थितीत करुण नायर बर्मिंगहॅम कसोटीत भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी
करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra