लष्कर परिसरात स्लॅब कोसळून कामगार ठार, चौघे जखमी
पुणे, 2 जुलै (हिं.स.) : लष्कर परिसरातील साचापीर स्ट्रीटवरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. शुभंकर मंडल (वय २०, रा. पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे. साचापीर स्ट्रीट
लष्कर परिसरात स्लॅब कोसळून कामगार ठार, चौघे जखमी


पुणे, 2 जुलै (हिं.स.) : लष्कर परिसरातील साचापीर स्ट्रीटवरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. शुभंकर मंडल (वय २०, रा. पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे. साचापीर स्ट्रीटवरील जुने हॉटेल ओयसिसच्या शेजारी इमारतीचे काम सुरू होते. तेथे उभारलेल्या लाकडी सांगाड्यावर पश्‍चिम बंगालमधील पाच तरुण कामगार काम करत होते.स्लॅबचा भाग कोसळल्याने लाकडी सांगाड्यावरील फळीसह हे पाचही कामगार खाली पडले. त्यात शुभंकर मंडल याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार कामगार गंभीर जखमी झाले. जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.स्थानिकांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. बांधकाम व्यावसायिकाने कामगारांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली नाही. संतप्त नागरिक आणि कामगार हक्क कार्यकर्त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि कँटोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande