अकोला, 2 जुलै (हिं.स.)। आम आदमी पार्टी मध्ये आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश आणि उत्साह भरण्यासाठी प्रदेश पातळीवरील कार्यकारिणीमध्ये l फेरबदल करून नवीन कार्यकारिणी घोषित केली आहे. ज्यामध्ये अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात आम आदमी पक्ष पोहचवून जिल्हाभर कार्यकर्त्यांची फळी उभी करणारे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांचा प्रदेश कार्यकारिणी मध्ये समावेश करून त्यांचेवर प्रदेश सह सचिव पदाची जबाबदारीं सोपवीण्यात आली आहे.आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त सह्या असणारे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबले यांच्या कार्यकाळात विविध प्रश्नांवार वेळोवेळी आंदोलने, निदर्शने आणि मोर्चे काढले गेल्याने आम आदमी पार्टी हा पक्ष जिल्ह्यात खेडयापाड्यात पोहचला होता. मात्र त्यानंतर पार्टीने कोणत्याही निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतल्याने पार्टी कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला आहे. आता मात्र देशपातळीवर पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्वच निवडणुका लढविन्याचे जाहीर केल्याने उत्साही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी पद नियुक्त्या दिल्या आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातीलज्ञानेश्वर साकरकर आणि डॉ तुषार बायस्कर यांच्या सह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागण्याचा निश्चित केले आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद कांबळे हे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष असून, समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पक्षामध्ये सामाजिक समतोल साधण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर प्रभावी नियोजन करण्यासाठी कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करणे गरजेचे असल्याचा अभिप्राय अमरावती विभाग प्रमुख मनिष मोहोड यांनी दिल्यानुसार ही नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजाळे, महानगर अध्यक्ष महसूद अहमद खान ,अकोला जिल्हा महासचिव प्रदिपकुमार गवई यांनी ह्या नवीन नियुक्तीचे स्वागत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे