अकोला : मोहरमच्या तयारीसंदर्भात मनपा उपायुक्तांना निवेदन
अकोला, 2 जुलै (हिं.स.) : अकोला येथील लक्ष्मी कॉलनी येथील ईराणी समाजाच्या इमामबाड्यात दरवर्षी मोहरमच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने मातमी कार्यक्रम आणि मिरवणूक काढली जाते. यंदाही रविवार, मोहरमची १०वी तारीख असल्यामुळे समाजाच्या रीतीरिवाजानुसार मातम स
प


अकोला, 2 जुलै (हिं.स.) : अकोला येथील लक्ष्मी कॉलनी येथील ईराणी समाजाच्या इमामबाड्यात दरवर्षी मोहरमच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने मातमी कार्यक्रम आणि मिरवणूक काढली जाते. यंदाही रविवार, मोहरमची १०वी तारीख असल्यामुळे समाजाच्या रीतीरिवाजानुसार मातम साजरा केला जाणार आहे. दरवर्षी अकोला मनपाच्या वतीने या मिरवणुकीच्या मार्गावर मुरुम टाकण्यात येतो, जेणेकरून मातम करणाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही. मात्र यावर्षी अजूनपर्यंत संबंधित मार्गावर मुरुम टाकलेला नाही, यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने अकोला मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर लक्ष्मी कॉलनी इमामबाडा मार्गावर मुरुम टाकण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. मनपा उपायुक्तांनी प्रतिनिधींना आश्वासन दिलं की, ते संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर मुरुम टाकण्याची पूर्ण प्रयत्न करतील. निवेदन देताना उपस्थित होते की, आसिफ अहमद खान, जावेद पठाण, मोहम्मद फिरोज, मोहम्मद मोसिन, शहजाद रब्बानी, शेख आसिफ आणि अंजार खान.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande