पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा इम्रान खान यांना जामीन देण्यास नकार
इस्लामाबाद, 29 जुलै (हिं.स.) पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०२३ च्या आठ प्रकरणांमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या वकिलाच्या विनंतीवर नोटीसही जारी केली नाही
इम्रान खान


इस्लामाबाद, 29 जुलै (हिं.स.)

पाकिस्तान

सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०२३ च्या आठ प्रकरणांमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान

यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या वकिलाच्या

विनंतीवर नोटीसही जारी केली नाही. आणि या प्रकरणांच्या जामीन अर्जांवरील सुनावणी

१२ ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने ९ मे २०२३

च्या दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे संस्थापक इम्रान

खान यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. या प्रकरणात लाहोर कॉर्प्स कमांडरच्या

घरावर हल्ल्याचाही समावेश होता. तुरुंगात असलेल्या पीटीआय नेत्याने लाहोर उच्च

न्यायालयात आव्हान दिले. २४ जून रोजी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून

लावली. गेल्या आठवड्यात लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध इम्रान यांनी

सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश याह्या आफ्रिदी

यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठाने आज या याचिकांवर विचार केला.

पीटीआयचे

सरचिटणीस सलमान अक्रम राजा हे त्यांचे नेते इम्रान यांच्या वतीने न्यायालयात हजर

झाले. कारण त्यांचे मुख्य वकील सलमान सफदर देशाबाहेर असल्याने सुनावणीला उपस्थित

राहू शकले नाहीत. राजा यांनी खंडपीठाला माहिती दिली की, सफदर यांनी पुढील

आठवड्यापर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. त्यांनी विनंती केली की, या

प्रकरणाशी संबंधित पक्षांना नोटीस बजावण्यात यावी आणि पुढील आठवड्यात सुनावणी

निश्चित करावी. खंडपीठाने विनंती फेटाळली आणि १२ ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande