अकोला - सावत्र बापानेच संपविले नऊ वर्षाच्या मुलाला
अकोला, 3 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यातील अकोटमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची त्याच्या सावत्र बापाने हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. दर्शन पळसकार असे मृतक मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सावत्र बाप आरोपी आकाश कान्हेकर आणि त्याचा मित्र गौरव गायगोल
P


अकोला, 3 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यातील अकोटमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची त्याच्या सावत्र बापाने हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. दर्शन पळसकार असे मृतक मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सावत्र बाप आरोपी आकाश कान्हेकर आणि त्याचा मित्र गौरव गायगोले यांना अटक करण्यात आली आहे. मुलाच्या आईने चार महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते. संपत्तीच्या संशयातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावत्र बापाने दर्शनची हत्या का केली याचं कारण अद्यापही समोर आलं नसून अकोट पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. हत्या केल्यानंतर आरोपीने दर्शनचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावत्र मुलगा भविष्यात संपत्तीत हिस्सा मागू शकतो, याच संशयातून सावत्र बापानेच त्याच्या मित्राच्या मदतीने हत्या केल्याची माहिती मिळत आहे. आकाश साहेबराव कान्हेरकर असं मारेकरी सावत्र बापाचं नाव आहे. याशिवाय गौरव वसंतराव गायगोले असं मारेकऱ्याला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव आहे. अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहे.

2 जुलै रोजी सकाळी साडे 8 वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता दर्शन घराबाहेर निघून गेला असल्याची तक्रार आकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल होती. मुलाच्या बेपत्ता प्रकरणी आईने तक्रार दिली होती. बेपत्ताप्रकरणी तपास सुरू असतानाच सावत्र वडिलांवर पोलिसांना संशय झाला. कारण, अकोट शहरातल्या चौकातील नुकतेच लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात वडिलांसोबत मुलगा जात असताना दिसून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी सावत्र वडिलांची कसून चौकशी केली असता त्याने सावत्र मुलाला कायमचं संपवलं असल्याचं बाब समोर आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande